सना ः येमेनच्या हाउती दहशतवाद्यांनी रविवारी सौदी अरबच्या तेल उद्योग केंद्रावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली. त्यामध्ये पेट्रोलियम निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रास तनुरामधील सौदी अरामकोचा समावेश आहे. वैश्विक ऊर्जा सुरक्षेवर हा अयशश्वी हल्ला असल्याचे रियादने म्हटले आहे. हल्ल्यानंतर सौदी अरबला अर्ध्याहून अधिक तेल उत्पादनाला अस्थायी स्वरूपात बंद करावे लागले. त्यामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर (जवळपास पाच हजार रुपये) प्रति बॅकेलच्यावर पोहोचल्या आहेत. त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. फेब्रुवारी २०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती या स्तरावर पोहोचल्या आहेत. गोल्डमॅन सॅक्शच्या वृत्तामध्ये कच्च्या तेलाच्या किमती लवकरच ८० डॉलर प्रति बॅरेलपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राजधानी सनासह येमेनच्या मोठ्या क्षेत्रावर कब्जा केलेल्या हाउती दहशतवाद्यांनी दावा केला की, रविवारी सौदीच्या दम्माम, एसिर आणि जिजैन शहरांमधील सैनिक तळांवरही हल्ले करण्यात आले. १४ ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्र डागण्यात आली. रास तनुरामध्ये अससेल्या एक तेल भांडार यार्डमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आल्याचे सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले. परंतु सशस्त्र ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र धहरानमध्ये एका रहवासी परिसराजवळ पडले. या परिसराचा उपयोग सरकारी तेल कंपनी अरॅमको करते. अरॅमको जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. परंतु इथे कोणत्याही संपत्तीचे नुकसान झाले नाही.
हे ठिकाण इराण, इराक आणि बहरीनच्या जवळील खाडीच्या किना-यावर आहे. इथे अमेरिकेच्या नौसेनेचे मोठे केंद्र आहे. येमेन अदनच्या खाडीच्या नैऋत्य दिशेला हजारो किलोमीटर दूर आहे. हल्ल्याची घोषणा केल्यानंतर सौदीच्या दम्मम, असीर आणि जजानच्या सैनिक ठिकाणांवरही हल्ला केल्याचं हाउती दहशतवाद्यांनी सांगितले.