मुंबई – कधी राजकीय सेवा देत तर कधी जाहिरातदारांना तुमचा डेटा विकून फेसबुक, गुगल आणि इतर कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. या माध्यमातून ससर्वसामान्य नागरिकांना उत्पादनाप्रमाणे वापरण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे आता आपली प्रायव्हसी कशी जपावी याची चर्चा जगभर सुरू झाली आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या अटी अशा आहेत की यांच्यापासून वाचायचे असेल तर मोबाईलवरून हे अॅप डिलीट करणे हाच एकमेव पर्याय डोळ्यापुढे दिसतो. गुगलच्या सेटींमध्ये मात्र काही बदल करून यातून वाचता येणे शक्य आहे.
गुगल – खासगी माहिती आणि हजारो ऑनलाईन घडामोडींसाठी जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेला गुगलच खरे तर डेटा पर्सनलाईज करण्याच्या नावावर आपली माहिती स्टोअर करतोय. एवढेच नाही तर आपल्या डेटाच्या माध्यमातून १५० पेक्षा अधिक कंपन्यांकडून फायदाही कमवत आहे.
जाहिरात कंपन्या हटवा – फोनच्या सेटींगमध्ये जाऊन गुगल आयकॉनवर क्लिक करावे. काही मोबाईलमध्ये हे आयकॉन सिस्टीम अँड डिव्हाईस किंवा अकाऊंट अँड सिंक या नावाने दिसेल. मॅनेज युवर गुगल अकाऊंटवर क्लिक करा. त्यात गुगल अकाऊंटमध्ये डेटा अँड पर्सनलायझेशन सेक्शनमध्ये सेटींगवर क्लिक करा. मोअर ऑप्शनमध्ये जाऊन पर्सनलायझेशन बंद करू शकता.
व्हॉट्सअॅप – हे अॅप डिलीट करूनही सुटका शक्य नाही. कारण यावर तीन महिने डेटा राहतो. कंपनी जवळपास ९० दिवस तुमचा डेटा आपल्याकडे ठेवते. हा डेटा सॉफ्टवेअरमधील उणिवा दूर करण्यासाठी वापरला जातो.
अॅप नाही अकाऊंट डिलीट करा – तुम्ही व्हॉट्सअॅपच्या प्रणालीवर खुश नसाल तर केवळ अॅप डिलीट करून उपयोग नाही. कारण जेवढा वेळ आपण या एपवर होतात तेवढ्या दिवसांचा संपूर्ण डेटा कंपनीकडेच स्टोअर असणार आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपच्या सेटींगमध्ये जाऊन अकाऊंटमध्ये डिलीट माय अकाऊंट ऑप्शन निवडा.