सोशल नेटवर्कींग फोरमचे स्थापना वर्ष २०१० सालापासून दिपावलीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी ही संकल्पना राबवली जात आहे. काल सलग ११ व्या वर्षी या पद्धतीने दिपावली साजरी करताना मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या सर्व पाड्यांवरील मुलांसह, पेगलवाडी आणि इतर काही पाड्यांवरील ५०० मुलांना शैक्षणिक साहित्य ऊपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच काही कुटूंबियांना ब्लँकेट्सचेही वितरण करण्यात आले.
वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सील, बालमीत्र आणि इतर साहित्य मिळताच हरखून गेलेल्या या पाड्यांवरील मुलांच्या आनंदात फोरमच्या सदस्यांनी अनोख्या दिपावली ऊत्सवाला सुरूवात केली.
या उपक्रमात योगदान देणारे सदस्य आनंद सिंग, अमेरिका, सुभाष वानखेडे, ऑस्ट्रेलिया, राजेश जाधव, मुंबई,
दिपाली आयरे, बडोदा, जिवन सोनवणे, विजयाताई सोनवणे, डाॅ. योगेश जोशी, डाॅ. विशाल पवार, डाॅ. किरण गिते, उमाकांत सोनवणे, डाॅ. दिपक भालेराव, डाॅ. हेमंत बोरसे, डाॅ. संगिता मखारीया, डाॅ. मनिषा भुतडा हे आहेत. नेहमीप्रमाणे फोरमच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत शेकडो बालकांची दिवाळी आनंददायी करण्यात आली.
शैक्षणिक दिवाळीच्या या उत्सवावेळी जिवन सोनवणे, प्रमोद गायकवाड, डाॅ. किशोरी भालेराव, गावडे, रामदास शिंदे, सरपंच सरिता झोले, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भावच सारे काही सांगत होते.








