नाशिक – विवाहासारख्या सोहळ्यावर अजूनही सोशल डिस्टन्सिंग ची बंधने आहेत. त्यामुळेच त्यातून आनंदाची अनुभूती मिळवावी लागते. परंतु सोहोळ्याचा एक भाग असलेल्या स्नेहभोजनालाही मुकावे लागते. याच पार्श्वभूमीवर ग्रंथ तुमच्या दारीचे’ शिल्पकार विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा आनंददायी सोहोळा पार पडला आणि एका
नव्या प्रथेची सुरुवात झाली.
कोरोनाच्या संकट काळात सहभोजन जरी शक्य नसले तरी फेसबुक, व्हॉट्सअप्प, फोटो या माध्यमातून लग्नाचा आनंद घेतांना आपआपल्या घरी सुखरूप राहून छान यजमानांनी पाठवलेले घरपोच मिष्ठांन्न सुग्रास स्नेहभोजन मात्र नक्कीच शक्य आहे.
सौ स्मिता व सतीश गायधनी नाशिक यांनी त्यांची कन्या सुखदा आणि अकोला येथील सौरभ परभणीकर यांच्या शुभविवाह च्या निमित्ताने ही अभिनव संकल्पना साकारली.
नाशिक येथील गायधनी कुटूंबियांचे १५० स्नेहीस्वजन यांनी करोनाच्या संकटामुळे घरातूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचा आनंद घेतला. सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन केटरर्स राहुल भावे आणि चित्रा थत्ते यांच्या सहकार्याने घरीबसल्याच मिष्ठांन्न स्नेहभोजनाचा तृप्त अनुभव घेतला.
सहभोजन नाही तरी स्नेहभोजन नक्कीच या संकल्पनेमुळे सर्व जण आपल्याघरीच सुखरूप राहून लग्नाचा आणि भोजनाचा आनंद घेऊ शकले. त्यामुळे या संकल्पनेची सर्वत्र चर्चा होत आहे.