गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सोमवारचा कॉलम- स्टार्टअप की दुनिया – दोन तरुण अन् ‘मीशो’चा जन्म

by Gautam Sancheti
ऑगस्ट 31, 2020 | 1:00 am
in इतर
2

दोन तरुण अन् ‘मीशो’चा जन्म

 

 

फेसबुकसारख्या कंपनीने १८५ कोटी रुपये गुंतवणूक केलेल्या ‘मीशो’ या अनोख्या स्टार्टअप आणि विदीत अत्रेय व संजीव बर्नवाल या तरुणांची ही संघर्षमय यशोगाथा….

डॉ. प्रसाद जोशी

(लेखक व्यवस्थापनशास्त्रातील अनुभवी कॅर्पोरेट ट्रेनर व मेट कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत)

Dr. Prasad Photo
डॉ. प्रसाद जोशी

दोन विशितले तरुण . . .
आयआयटी मधून अभियान्त्रिकी पदवी संपादन केलेली . . .
पदवी प्राप्त करून बड्या कंपनी मध्ये उत्तम पगारावर नोकरी करत होते . . .
पण तरीही मनात एक विलक्षण अस्वस्थता होती. . .
काही तरी स्वतःचे करायचे आहे . . .
स्वतः साठी काम करायचे आहे . . .
नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हायचे आहे . . .
केवळ स्वतः कमवायचे नाही तर इतरांना देखील रोजगार देता आला पाहिजे . . अशी तळमळ लागलेली असतांना शांत बसवत नाही आणि त्यातूनच होते नवनिर्मिती . . .
त्यातूनच खरी सृजनशीलता उत्पन्न होते. आणि ही खुमखुमीच काही तरी जगावेगळे निर्माण करते.

विदीत अत्रेय आणि संजीव बर्नवाल  (वय २४-२५ वर्ष) हे दोघे ही दिल्लीच्या प्रतिष्ठित आयआयटी मधून अभियांत्रिकीची पदवी मिळवून आपल्या करिअरची सुरुवातच करीत होते. खासगी कंपनी मध्ये नोकरी करू लागले पण आतून असलेली उद्योजकतेची उर्मी त्यांना एका वेगळ्या वाटेवर घेऊन आली.

झारखंड येथील रांची शहरातील एका मध्यम वर्गीय कुटुंबातील संजीव याने केवळ जीवशास्त्र अभ्यासावा लागू नये म्हणून अभियांत्रिकीची वाट धरली. आयआयटी मध्ये प्रवेश मिळवून चांगले यश संपादन केले. वडील एका कंपनीत नोकरीला व आई गृहिणी असलेल्या संजीवच्या अपेक्षा ही एका चांगल्या पॅकेज पर्यंत सिमीत होत्या. आणि तसं घडलेही. संजीवला जपान मध्ये थेट सोनी कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळाली. सर्व उत्तम होते पण मायदेशी येऊन काही तरी वेगळे करावं असं त्याच्या मनात होतं. त्याचसाठी त्याने आपला वर्ग मित्र व होस्टेल रूम पार्टनर विदितशी संपर्क साधला.

विदीत ही बंगळुरू येथे एका चांगल्या कंपनी मध्ये कार्यरत होता. बंगळुरू शहर हे टेक्नॉलॉजी स्टार्टअप साठी नावाजलेले शहर. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे हे शहर. संजीव ने विदीतकडे एखाद्या स्टार्टअप मध्ये काम मिळवण्यासाठी विचारणा केली असता विदीतने त्वरित उत्तर दिले “स्टार्टअप मध्ये काम करण्या ऐवजी आपणच का स्टार्टअप सुरू करू नये?”

साधारण जुलै २०१५ मध्ये दोघांनी एकत्र येऊन काही तरी वेगळं करायचे ठरवले. आणि आपला सेट असलेला चांगला समजला जाईल असा जॉब सोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग केलेले असले तरी प्रोग्रामिंगमध्ये रुची असल्याने त्यांनी एका वेगळ्या ऑनलाईन पोर्टलची संकल्पना अस्तित्वात आणली. “फॅशनियर” (Fashnear) ह्या नावाने त्यांनी आपल्या पहिल्या ऑनलाईन बिझनेसला सुरुवात केली. “फेशनेबल कपड्यांचे स्विगी” अशीच ओळख त्यांनी आपल्या ह्या व्यवसायाची करून दिली. म्हणजे बंगळुरू शहरात शॉपिंग करण्यासाठी इच्छूक असलेल्या पण ट्रॅफिकला कंटाळून किंवा वेळेच्या आभावाने दुकानापर्यंत न पोहोचू शकणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी हा उद्योग सुरु केला.

ह्यात ग्राहकाने आपल्या मोबाइल वरूनच फॅशनियर अँप च्या साहाय्याने आपल्या आवडत्या दुकानातील कपड्यांचे फोटो पाहून ३ ड्रेस निवडायचे. आणि मग फॅशनियरचा डिलिव्हरी बॉय ते तिन्ही ड्रेस घेऊन तुमच्या घरी येईल. त्यातला तुम्ही एक ड्रेस निवडायचा आणि पेमेन्ट करायचे. ह्या व्यवसायात त्यांनी फार मेहनत घेतली. दुकानदारांना भेटायचे, त्यांच्या दुकानाचे रेजिस्ट्रेशन आपल्या अँप वर करायचे, त्या दुकानातल्या कपड्यांचे फोटो स्वतः काढून ते अँप वर टाकायचे आणि मग त्या अँप चे मार्केटिंग करायचे. सुरुवातीला तर ह्या दोघांनी डिलिव्हरी बॉयचे देखील काम केले. ह्यामुळे ग्राहकाला नेमकं काय अपेक्षित आहे ह्याची कल्पना त्यांना येत गेली. हा व्यवसाय काही अंशी चांगला सुरु झाला पण ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बड्या खिलाडूंचा वाढता प्रभाव आणि संपूर्ण भारतातील वस्तू पुरवण्याच्या त्यांच्या असलेल्या व्यवस्थेमुळे हा व्यवसाय लवकरच बंद करावा लागला.

एका दुकानदाराने त्यांच्या ह्या बिझनेस मधली हवा काढून टाकली जेव्हा तो म्हणाला की मी स्वतः व्हाट्सअपवर नवीन कपड्यांचे फोटो ग्राहकांना पाठवतो आणि फोनवर ऑर्डर स्विकारतो. व माझा माणूस जाऊन दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरी देतो. तेव्हा तुमच्या ह्या बिझनेस मध्ये काहीच नाविन्य नाही.

पण ह्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक ग्राहक व व्यावसायिक यांच्या भेटी झाल्या, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास झाला. कोणाला नेमकं काय हवंय आणि ते कसं पुरवता येईल याचा विचार सुरु झाला.

हे सर्व करत असतांना त्यांच्या असे लक्षात आले की, असे अनेक महिला, तरुण किंवा नोकरदार आहेत ज्यांना आपला व्यवसाय सुरु करायचा आहे पण त्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्या कडे नाही, किंवा त्यासाठी लागणारा वेळ ते देऊ शकत नाहीत. एखादाच असा व्यक्ती असतो जो आपले दुकान सुरु करू शकतो पण त्यासारखे अनेक असतात ज्यांना आपले दुकान सुरु करायचे असते पण पैसे, वेळ व मनुष्यबळ यांच्या अभावाने सुरु करता येत नाही. काही महिला घरूनच साड्या, ड्रेस मटेरियल, इतर कपडे विकतात पण त्यासाठी त्यांना माल विकत आणून ठेवावा लागतो आणि तो नाही विकला गेला तर त्यात भांडवल अडकून राहते. मग ह्यासर्वांचा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करत असतांना त्यांना एक बिझनेस आयडिया आली. आणि त्यातूनच निर्मिती झाली आजच्या Meesho “मीशो” ची.

XF9FAV1r 400x400

” मीशो ” म्हणजे “मेरी शॉप”. माझे स्वतःचे दुकान.  ” मीशो ” एक असा प्लॅटफॉर्म आहे जो अशा सर्व व्यक्तींचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करतो आणि तेही विना भांडवल.  ” मीशो” हे एक अँप आहे ज्यात देशभरातील कुणीही व्यक्ती रजिस्टर करू शकते. २०,००० हुन अधिक मोठे व्यावसायिक ह्या अँप वर जोडलेले आहेत. ते आपल्या नवीन प्रॉडक्ट्स्चे फोटो आणि माहिती अपलोड करतात. अँप वर असलेल्या हजारो प्रॉडक्ट्स् मधून तुम्हाला आवडणाऱ्या प्रॉडक्ट्स्चे फोटो निवडून आपल्या सोशिअल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक , व्हाट्सअँप, इंस्टाग्राम इ. वर शेअर करावे. आपल्या संभाव्य ग्राहकांना पाठवावे.

ज्या प्रॉडक्ट् ची विचारणा आपल्या ग्राहकाकडून होईल त्याच प्रॉडक्ट्स्ची ऑर्डर ह्या अँप मधूनच करू शकता. ती वस्तू तुम्ही विकत घेण्याची गरज नाही. केवळ ग्राहकाचा पत्ता अँप वर ऑर्डर सोबत दिला तर ग्राहकाला थेट होम डिलिव्हरी मिळते. मीशो सुरुवातीला फक्त कपडे खरेदी विक्री साठी ओळखले गेले. पण आता कपड्यांसोबत कॉस्मेटिक्स, ज्वेलरी , किचन वेअर, ट्रॅव्हल पॅकेजेस इ. देखील हातोहात घेतले-दिले जात आहे. थोडक्यात खऱ्या अर्थाने बिन भांडवली धंदा तुम्ही करू शकता.

मीशो ही एक कम्युनिटी तयार होत आहे. नवीन जॉईन करणाऱ्या व्यावसायिकाला अनुभवी लोक मदत करतात, कशी सुरुवात करावी, कोणते विक्रेते, कोणत्या वस्तू, किती नफा ह्याबद्दल ह्या अँप वरील जुने लोक मार्गदर्शन करतात, तेही मोफत. त्यामुळे एका मोठ्या परिवाराचे रूप ह्या उद्योगसमूहाला आले आहे.

ह्यात प्रॉफिट शेअर करण्याची देखील एक वेगळी पद्धत आहे. तुम्ही विकणार असलेल्या वस्तूचे बिल तुम्हीच ह्या अँप वरच तयार करता. त्यात फक्त तुम्हाला मिळालेली किंमत व डिलिव्हरी चार्जेस असतात. त्यात तुमचा नफा तुम्हीच ठरवू शकता. नफा शून्य देखील असू शकतो. हे ठरवण्याची पूर्ण मुभा तुम्हाला मिळते.

“मीशो” ची सुरुवात होण्या दरम्यान भारतात ह्या व्यवसायाला पोषक असे वातावरण आपोआपच निर्माण होत होते. ह्याच काळात रिलायन्स जिओ चा विस्तार जोरात होत होता. त्यामुळे अगदी स्वस्त दारात इंटरनेट सेवा अगदी खेडोपाडी पोहोचत होती. त्यासोबतच फेसबुक व व्हाट्सअँप देखील तितक्याच झपाट्याने वाढत होते. ह्याला जोड यूपीआय सेवा जसे पेटीएम, फोनपे ह्या देखील तितक्याच जोमाने वाढत होत्या. ह्या सर्व गोष्टी व यांचा सामान्य माणसाच्या जीवनावर होणार परिमाण ह्या तरुण उद्योजकांनी योग्य वेळेत ओळखला होता व आपल्या दूरदृष्टीने त्यांनी ह्या व्यवसायाची पायाभरणी केली

कल्पना जरी चांगली असली तरी विदित आणि संजीव ह्या तरुण पण उत्साही जोडीला आपल्या ह्या स्वप्नाला सत्यात उतरावतांना सर्वात मोठी अडचण ठरत होती ती आर्थिक. लोकांना बिन भांडवली धंदा देतांना स्वतःच्या व्यवसायासाठी भांडवल जमवणे अवघड जात होते. कोणी गुंतवणूकदार मिळेल का ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १५ जानेवारी २०१६ च्या सीड फँडींग राऊंड मध्ये त्यांना अपयश स्वीकारावे लागले. पण त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि मार्च २०१६ मध्ये त्यांना पहिली १,८०,००० डॉलर (एक करोड पस्तीस लाख रुपयांची) गुंतवणूक मिळवण्यात यश आले.

जसे जसे त्यांच्या कामाला वेग येत होता आणि भारत भरात काम पसरत होते, तसे त्यांना गुंतवणूकदार ही मिळत होते. फेसबुक ने देखील आपली भारतातली पहिली $२५ मिलियन (साधारण १८५ करोड रुपये) गुंतवणूक ह्याच कंपनीत केली. ऑगस्ट २०१९ मध्ये मिळालेली सर्वाधिक $ १२५ मिलियन (९०० करोड रुपयेहुन अधिक) ची गुंतवणूक मिळून आता “मीशो” चे एकूण फन्डिंग २१५ मिलियन डॉलर्स हुन अधिक आहे. ह्या क्षेत्रातील भारतातील हि सर्वात मोठी स्टार्टअप म्हणून ओळखली जाते.

मीशो चा ८०% बिझनेस हा लहान शहरं आणि गावांमधून येतोय. आज “मीशो”मुळे भारतातील २५ लाखाहून अधिक इच्छुक लघुउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय दिला आहे. ह्या पैकी ९०% महिला आहेत आणि त्यातील ७०% ह्या गृहिणी आहेत ज्यांना आज पर्यंत स्वतःचे पायावर उभं राहायचं होतं पण आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक अडचणींमुळे करता येत नव्हतं. आज त्या सर्व उभ्या आहेत मीशोमुळे.

ह्या दरम्यान एका गृहिणी चा अनुभव ते सांगतात. एक सामान्य कुटुंबातील स्त्री गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पतीच्या मागे लागत होती की मला केवळ १० हजार रुपये द्या, मी काही कपडे आणून आपल्या परिसरात विकेल, तुम्हाला ही थोडा हातभार लावेल पण कधी आर्थिक अडचण तर कधी कौटुंबिक विरोधामुळे तिची ही इच्छा पूर्ण होत नव्हती. पण आज मीशो मुळे तिचे स्वतः च्या व्यवसायाचे स्वप्न साकार होत आहे, आणि ते ही बिना भांडवली. अशा अनेक स्त्रिया व पुरुषांचे स्वप्न आज मीशो मुळे पूर्ण होत आहे.

मीशो प्रतिवर्षी आपला विस्तार वाढवत आहे आणि अधिकाधिक लोकांना ह्या समूहात सामावून घेत आहे. आणि हे सर्व घडवून आणत आहे अवघ्या विशीतले हे दोन तरूण, विदित अत्रेय आणि संजीव बर्नवाल यांनी.

मीशो चे नजिकचे उद्दीष्ट ५० लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वतः चा स्वतंत्र उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देण्याचे आहे. भारताबाहेर ही मीशो ने आपली वाटचाल सुरू केली आहे.  आणि लवकरच अनेक देशांमध्ये आपल्याला मीशो चे नाव जगभरात पसरलेले दिसेल व भारताच्या ह्या नवतरुण उद्योजकांचे नाव जगातील यशस्वी उद्योजकांमध्ये घेतले जाईल. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

prof.prasadjoshi@gmail.com

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम

Next Post

आले स्कॅनिंगचे भारतीय अॅप; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Next Post
IIT1

आले स्कॅनिंगचे भारतीय अॅप; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

Comments 2

  1. रविकिरण says:
    5 वर्षे ago

    सुंदर विवेचन .. धन्यवाद !

    उत्तर
  2. Anil says:
    5 वर्षे ago

    विदित & संजीव,
    Best wishesh for ‘MEESHO’.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011