मुंबई – लग्न सराईच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. परंतु काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. सध्या सोन्याचा भाव १२ हजारांनी घसरला असून, ग्राहकांना “सोनेपे सुहागा” असं म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातशुल्कात केलेली कपात, भांडवली बाजारातील तेजी या घटकांमुळे सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सोन्याचा दर ४४ हजार रुपयांच्या आसपास आहे.
धूलिवंदनानिमित्त मल्टी कमॉडिटी बाजार बंद आहे. शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात किंचित सुधारणा झाली. एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४४,६५० रुपयांवर स्थिरावला. त्यात ४५ रुपयांची घसरण झाली. दिवसभरात सोन्याचा भाव ४४,४४१ रुपये इतका खाली घसरला होता. चांदीच्या भावात १८५ रुपयांची घसरण होऊन तो ६४,६८४ रुपये किलोवर बंद झाला.