नवी दिल्ली – देशांतर्गत सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोमवारी सोन्या-चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू दर घसरले. मात्र, मंगळवारी या दोघांचेही दर वाढले आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या किंमतीत 104 रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे सोन्याचा दर दहा ग्रॅम 48,703 रुपयांवर आला. जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात किंमत कमी झाली. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅमला 48,807 रुपयांवर बंद झाले.
सोन्यासह चांदीच्या स्पॉट किंमतीतही सोमवारी घट झाली. तर चांदीच्या भावात 736 रुपयांची घसरण नोंदली गेली. चांदीचा दर 62,621 रुपये प्रति किलो झाला. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात चांदीचा भाव 63,357 रुपयांवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सायंकाळी सोन्याचे वायदा आणि स्पॉटचे दोन्ही भाव घसरले. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी संध्याकाळी सोन्याचे जागतिक वायदा मूल्य O.31 टक्क्यांनी कमी होऊन 1,834.30 डॉलर प्रति औंस पातळीवर असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त, सोन्याची जागतिक किंमत सध्या औंस 0.32 टक्क्यांनी किंवा 5.81 डॉलर कमी होऊन प्रति औंस 1,833.05 डॉलरवर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव
सोमवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा वायदा आणि स्पॉटचे दोन्ही भाव घसरले. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सायंकाळी मार्च 2021 च्या चांदीच्या किमतीत 1.76 टक्के किंवा 0.43 डॉलरची घसरण झाली आणि ते औंस 23.83 डॉलरवर बंद झाले. त्याखेरीज चांदीची जागतिक किंमत 1.49 टक्क्यांनी किंवा O.36 डॉलर घसरुन प्रति औंस 23.83 डॉलरवर दिसून आली.
मंगळवारचे दर असे
आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात ११९ने वाढ झाली. त्यामुळे प्रति दहा ग्रॅमचे दर ५० हजार ६५ रुपये झाले आहेत. तर, चांदीचा एमसीएक्समधील दर ६५ हजार ३८८ रुपये आहे.