मुंबई – येथील सराफा बाजारात आज (१८ ऑगस्ट) सोन्याच्या भावात १० ग्रॅममागे ७१० रुपयांची वाढ झाली. त्यामुळेच सोन्याचा दर आज ५३ हजार २१० रुपये इतका होता. तर, चांदीच्या भावात किलोमागे २ हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा दर ७१ हजार १०० रुपये प्रति किलो इतका होता.
दिल्लीत सोन्याच्या भावात तब्बल १ हजार १८२ रुपयांची वाढ झाली आणि तो ५४ हजार ८५६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. तर चांदीच्या भावात किलो मागे १ हजार ५८७ रुपयांची वाढ झाली आणि तो ७२ हजार ५४७ रुपये इतका झाला.