नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने सामाजिक सेवा सुरू करून लोकांना वेगवेगळ्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आता सोनूने देशातील सर्वात मोठी रक्तपेढी तयार करण्याची योजना तयार केली असून एका व्हिडिओद्वारे ही गोष्ट सोशल मीडियावर उघड केली आहे.
सोनूने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये असे सांगितले की, दररोज १२ हजार रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात. आपले वीस मिनिटे एखाद्याचा जीव वाचवू शकतात. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला डॉक्टर बनण्याची आवश्यकता नाही. तर रक्तदानाची गरज आहे.
चला जीव वाचवू या. तुमची स्वतःची रक्तपेढी लवकरच येणार आहे. ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्याशी रक्तदात्यांना जोडणे हे या योजनेचे उद्दीष्ट असेल. तसेच सोनू फॉर यू नावाचे एक अॅप लॉन्च करून ज्याला रक्ताची आवश्यकता आहे, अशा व्यक्तीने रक्तदात्याशी संपर्क साधला असेल आणि विनंती मिळाल्यावर रक्तदात्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्यास सक्षम केले जाईल. या रक्तपेढीद्वारे दुर्मिळ रक्तगटांच्या रक्ताची उपलब्धताही निश्चित केली जाईल.









