नवी दिल्ली – बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण चित्रपट अभिनेता सोनू सूद याने स्वत: सोशल मीडियावर एक लाख लोकांसाठी रोजगार योजना जाहीर केली आहे. सोनू सूद यांनी ट्विटरवर नोकरीच्या नवीन संधींबाबत माहिती दिली आहे. जणू काही सोनू सूद पुन्हा एकदा गरजू लोकांसाठी मसीहा बनला आहे.
१० कोटी लक्ष्य
अभिनेता सोनू सूदने या ट्विटमध्ये सांगितले आहे की, आम्ही एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. तसेच यानंतर ते येत्या ५ वर्षात सुमारे १० कोटी लोकांचे जीवन बदलण्याच्या योजनेवरही काम करत आहेत.
रोजगारासाठी हे अॅप
आता सोनू सूद देशातील कोट्यावधी लोकांना नोकर्या देण्याची व्यवस्था देखील करीत आहे. अशा लोकांसाठी सोनू सूद रोजगार योजना घेऊन आला आहे. सूदने यासाठी अनोखे अॅप तयार केले आहे. त्याची लिंक शेअर केली असून यासह त्याने मजेदार हॅशटॅगही लिहिले आहेत.
या हॅशटॅगमध्ये अब इंडिया बनेगा कमयाब- (#AbIndiaBanegaKaamyaab), गुड वर्कर – (#GoodWorker), नौकरी पाना हुआ आसान – (#NaukriPaanaHuaAasaan) यांचा समावेश आहे.
निर्णयाचे कौतुक
सोनू सूद यांनी केलेले हे ट्विट हजारो लाखो बेरोजगारांच्या चेहऱ्यावर आनंद आणून देत आहे. या योजनेबद्दल लोक सोनू सूद याचे कौतुक करून आभार मानत आहेत. सोनू सूद यांनी पूर्वी असा दावा केला होता की, आतापर्यंत या अभियानाद्वारे १ लाख २० हजार ५२ लोकांना नोकर्या देण्यात आल्या आहेत. आणि आता १ लाख लोकांसाठी ते पुन्हा नव्या संधीसह हजर झाले आहेत.
https://twitter.com/SonuSood/status/1370998014605619200