नागपूर – लाकूड कारखाने तथा आरी गिरण्यांचे (सॉ मिल) अतिरिक्त परवाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) रद्द केले आहेत. आता राज्यस्तरीय समितीने देखील लाकूड गिरण्यांना यापुढे परवाना देऊ नये अशी शिफारस केली आहे. तसेच कायद्याचा गैरवापर केल्यास कदाचित पुर्वीचे परवानेही होणार रद्द होऊ शकतात. बेसुमार लाकूडतोडावर सरकारने उपाययोजना म्हणून ही बंदी घातली आहे.
सॉ मिल परवान्यांपैकी ३४ कोल्हापूर सर्कलमध्ये, नाशिकमध्ये १०, चंद्रपुरात ५ आणि धुळ्यात १ परवाने देण्यात आले. एसएलसीने सॉमिलच्या मालकांना नवीनतम वापर थांबवायला सांगितला आहे. तरीही पीसीसीएफ कार्यालयाने संबंधित परवान्यांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
संबंधित घटकांना सॉ मिलचे संचालन थांबविण्यास सांगितले आहे आणि अनुपालन अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवावा, अशी मागणी केली आहे. मुख्य वन संरक्षक हे वनीकरण दलाचे प्रमुख आहेत. समितीचे सदस्य-सचिव एस.एस. दहीवाले यांनी चंद्रपूर, कोल्हापूर, नाशिक आणि धुळे येथील समितीला २ नोव्हेंबर रोजी हे निर्देश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर एसएलसीची बैठक झाली आणि परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.