शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सैन्यदलांनी काळानुरूप बदल स्विकारले, अत्याधुनिकतेकडे वाटचाल – मेजर जनरल ओक 

by Gautam Sancheti
डिसेंबर 13, 2020 | 6:34 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201213 WA0003 1

नाशिक – सैन्यदलांनी काळानुरूप बदल स्विकारत अत्याधुनिकतेकडे वाटचाल केलेली आहे, त्याचे चांगले परिणाम आपल्याला आजच्या काळात दिसू लागले आहे. त्यातूनच युवापिढीचे आकर्षण वाढले असून उच्च पदावर जाण्यासही ते उत्सुक असल्याचे दिसते, पण आण्विक काळात आपला विभाग (रेजिमेंट) सैन्यदल सक्षमीकरणात प्रबळ नेतृत्व आणि अपारकष्टाची तयारी हवी, हे त्यांनी विसरू नये,असे प्रतिपादन विशेष सेवा पदक विजेते मेजर जनरल मनोज ओक यांनी केले.सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थापक धर्मवीर डॉ.बा,शि.मुंजे यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेला सुरुवात झाली ओक यांनी `मिलीटरी लिडरशिप इन कॉन्टेम्पररी एन्वायरमेंट` या विषयावर पहिले पुष्प गुंफले. सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर अध्यक्षस्थानी होते. ओक यांनी डॉ.मुंजेच्या दूरदृष्टीकोनातून सैनिकी शिक्षणाची सोय म्हणून भोसला मिलीटरी स्कूल सुरु झाले. ब्रिटीश काळात त्याचे कार्य इतरांसाठी त्याचे कार्य प्रेरणादायी होते, त्यांच्याच विचाराचा वारसा संस्था पुढे नेत आहे याबद्दल आनंद व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली.

नेतृत्वगुण आणि रणनिती महत्वाची
सैन्य दलात नेतृत्व गुण आणि रणनिती ही महत्वाची असते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय सैन्यदलाने जगात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे असे नमूद करून ते म्हणाले,जागतिक स्तरावर राष्ट्रे आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने इतरांसमोर आव्हान निर्माण करू लागले आहे. १४ देश हे आपले सामर्थ्य वेगवेगळ्या द्वारे दाखविताना दिसतात. त्यात रशिया,चीन,ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल, पाकिस्तान, कोरीया सारखे देश पुढे आहे. इराण सारखा देश तर सॅटेलाईट कंट्रोलसह ड्रोन वापर इतर बाबींना प्राधान्य देत आपले साम्राज्य उभे करू लागला आहे.

भारताची शौर्यगाथा प्रेरदायीच
ते म्हणाले गलवान खोऱ्यातील लढाई असो कि पुलवामा,बालाकोट,उरी,पठाणकोटसारख्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्यदलाने आपली ताकद दाखवत इतरांना पळता भूई थोडी केली आहे. तीन दशकापांसून उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य पध्दतीने वापर करत मिळवलेले यश हे निश्चित प्रेरणादायी म्हणता येईल,आज तर चांगल्या नेतृत्वामुळे व भरपूर आर्थिक तरतूदीमुळे सैन्यदल सक्षमीकरण झाले आहे, त्यामुळे आपले सैनिक नव्या दमाने कुणाशीही आणि कधीही युध्द करू शकतात.

आण्विक युध्द आणि काश्मीर प्रश्न
नेतृत्वक्षमता चांगली असेल तर सैन्यदल अधिक जोमाने काम करू शकते, हे सांगतांना ओक यांनी आपल्या काळातील काही उदाहरणे दिली. पुढील काळात सोशिओ एकोनॉमिकचे आणि अदृश्य पणे हल्ला करणाऱ्या सैनिकांशी मुकाबला करण्याचे आव्हान आपल्या सैनिकांसमोर आहे, पण योग्य नेतृत्व व सक्षमीकरणामुळे त्यावरही मात करतील. आण्विक शस्त्रांचा धाक दाखवत काही देश घाबरवत आहे. पण आपले सैनिक डगमगणारे नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे, अध्यक्ष लेप्टनंट जनरल शेकटकर यांनी समाजाची एकत्रिकरणाची भावना निर्माण करून वसुधैव कुटुंबकम ची संकल्पना मांडली,

सोसायटीचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर यावेळी उपस्थित होते, नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अनिरूध्द तेलंग यांनी स्वागतगीत म्हटले, स्नेहा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले, मोहित पुरोहित यांनी आभार मानले. पंधरा तारखेपर्यत ही व्याख्यानमाला चालेल. आज रविवारी (ता.१३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.विजय खरे हे `भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संरक्षण विषयक विचार आणि सद्यस्थिती.` या विषयावर संवाद साधतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खुषखबर. RTGS सुविधा 24X7 सुरू

Next Post

नाशिक – पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी सुनील पवार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201213 WA0004 1

नाशिक - पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी सुनील पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011