नवी दिल्ली – सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा १० जानेवारी २०२० रोजी होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने आज जाहीर केले की राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) १० जानेवारी रोजी देशभरातील २३ राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशातील ३३ लष्करी शाळांमध्ये ६वी आणि ९वीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. Aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुली देखील सर्व ३३ लष्करी शाळांमध्ये ६ वीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेऊ शकतील.
https://aissee.nta.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करावे लागतील. एनटीएच्या www.nta.ac.in या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.