नाशिक – कोरोनासारख्या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी फार मोठा हातभार लावला आहे. याच धर्तीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने धर्मार्थ दवाखाना गरजू लोकांसाठी सुरु केला आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना अल्पदरात वैद्यकिय सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
नाशिक रोड येथील इंदिरा गांधी चौक , नारायण बापू नगरात सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ब्रह्मकुमारी शक्तीदेवी, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव, नगरसेविका मंगला आढाव, सेवा प्राय: संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी , प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, सेवा प्राय: दवाखाना सेवा भावनेतून लोकांसाठी सुरु करण्यात आलेला असून या दवाखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला होमिओपॅथीक,आयुर्वेदीक,रक्ताच्
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दवाखान्याचे उद्घाटन करुन संपुर्ण दवाखान्याची पाहणी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती करुन घेतली. यावेळी प्रकाश लोंढे, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव आणि सेवा प्राय: संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.