नाशिक – महाराष्ट्र पाणीपुरवठा व जल निस्सारण विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी देवबा निंबा भामरे ( वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश भामरे यांचे ते वडील तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिकच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांचे ते सासरे होत.