नाशिक – लॉकडाउनच्या काळात अनेक रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते त्यानंतर लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर ही कोव्हीड 19 चा धोका असल्याने काळजी म्हणून काही कोव्हीड स्पेशल रेल्वे च धावत होत्या परंतु त्यांचा थांबा हा प्रत्येक स्टेशनवर नसल्याने अनेक प्रवासी नागरिकांची गैरसोय होत होती आणि याचा फटका नांदगाव या रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना बसत होता .याची दखल घेत खा. डॉ भारती पवारांनी रेल्वे चे महाव्यवस्थापकांशी चर्चा करत अडचण समजून सांगत त्या ठिकाणी कमीत कमी ३ ते ४ गाड्या तरी सुरू कराव्यात म्हणून मागणी केली. मुंबईकडे जाण्यासाठी कुठलीच रेल्वे नसल्याने प्रवाशांना प्रवासासाठी अनंत अडचणी येत होत्या. या मागणीचा विचार करत रेल्वे मंत्रालयाने तातडीने सेवाग्रामचा थांबा देण्याचे नोटिफिकेशन काढले असून काही अंशी का होईना नांदगावहून मुंबई मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांची अडचण दूर होणार आहे टप्प्या टप्प्याने पुढील रेल्वे सुद्धा सुरू करणार असल्याचे आश्वासन रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिले असल्याचे खा. डॉ. भारती पवारांनी सांगितले आहे .सेवाग्रामचा थांबा नांदगाव येथे दिला असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांचे आभार मानले आहे