नाशिक – आयसीयु बेड न मिळाल्याने वडिलांना गमवावे लागलेल्या नाशिकच्या तरुणीने अखेर व्हिडिओद्वारे नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. सर्वसामान्यांना आयसीयु बेड मिळत नाही मग राजकारणी आणि सेलिब्रेटींना तो कसा मिळतो, असा खडा सवाल तिने महापालिकेसह सर्व यंत्रणांना केला आहे. यानिमित्ताने शहरातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
रश्मी पवार या तरुणीने फेसबुकद्वारे शहरातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. रश्मीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वेळेवर बेड न मिळाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचे तिने म्हटले आहे. रुग्णालयात उपचार मिळावे यासाठीही पवार कुटुंबियांना फिरावे लागले. अशात सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना तत्काळ आयसीयु बेड कसे उपलब्ध करून दिले जातात, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
रश्मीने व्हिडीओमध्ये पालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे. कोरोना काळात शासन मदतीला येत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बघा ती काय म्हणते आहे