अनेक सेलिब्रिटींचे हातामध्ये आकाशी रंगाच्या फिरोजा रत्नाचे ब्रेसलेट, बोटामध्ये अंगठी अथवा गळ्यात पेंडंट हमखास पाहायला मिळते. पीरोजक नावाच्या खडकापासून हे मिळतात. इंग्रजीत याला TURQUOISE म्हणतात.
फिरोजा बद्दल माहिती अशी – अनेक प्रकारांमध्ये फिरोजा पाहायला मिळतात. बऱ्याच देशांमधून हे रत्न उत्पादित होते. मुख्यतः आकाशी रंगाचे हे रत्न चांदी मध्ये वापरले जाते. नवग्रहांची संबंधित नवरत्न मध्ये याचा समावेश नसल्याने व्यक्तिगत आवड म्हणूनच ते वापरले जाते.
फिरोजाचे काही प्रमुख प्रकार असे….
इराणी फिरोजा-
हा सर्वाधिक वापरला जातो. त्यामध्ये देखील निशा पुरी व करमानी असे दोन प्रकार असतात. इराणी फिरोजा वर मुख्यतः सोनेरी अथवा तांबूस रंगाचे ठिपके पाहावयास मिळतात. हे दुर्मिळ असल्याने महाग मिळतात.
तिबेटी फिरोजा-
यावर जाळीदार काहीशी काळसर नक्षी असते. तर काहींवर निळसर ठिपके असतात. अमेरिकी फिरोजा- यामध्ये देखील ऍरिझोना नेवादा असे दोन प्रकार येतात. या प्रकारातील फिरोजा धूरकट आकाशी काहीसे हिरवे ठिपके असणारे असतात.
मेक्सिकन फिरोजा-
डाग रहित आकाशी रंगाचे हे रत्न असते.
इजिप्शियन फिरोझा-
यावर काळे डाग बघायला मिळतात…..
पोलो टाइट व मॅगवेसाईट हे आकाशी रंगाचे दगड देखील ट्रीटमेंट करून फिरोजा म्हणून विकले जातात.
अंगठी पेंडंट किंवा ब्रेसलेट बनवताना क्लोज सेटिंग प्रकारात बनवतात.
अंगठी मध्ये ५ कॅरेट पासून २१ कॅरेट पर्यंत तर पेंडंट अथवा ब्रेसलेट मध्ये ५१ कॅरेट पर्यंत फिरोजा वापरला जातो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!