मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी)ने मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. ईडीचे पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रताप यांचे पुत्र पुर्वेश आणि विहंग यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीचे पथक विहंग यांना घेऊन निघाले. ईडीच्या कार्यालयात विहंग यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्याचे आमदार आहेत. टॉप ग्रुपशी संबंधित चौकशी सध्या ईडी करत आहे. त्याअंतर्गतच हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रताप सरनाईक हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ईडीच्या पथकाने प्रताप यांचे पुत्र विहंग आणि पुर्वेश यांची चौकशी केल्याचे समजते.
दरम्यान, ईडीची ही कारवाई सुडबुद्धीने आणि शिवसेना नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी असल्याचा आरोप सेना नेत्यांकडून होत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)








