नाशिक – अपार्टमेंटमध्ये चालणा-या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकत पोलिसांनी व्यवसाय चालवणा-या दोन जणांसह सहा ग्राहकांना ताब्यात घेत या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पोलिसांनी पश्चिम बंगाल व बिहार येथील १३ महिला व मुलींची सुटका केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनय नगर येथील प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये फिलोनिमा शर्मा व अर्जुनसिंग चौहान हे अपार्टमेंट व त्याला लागून असलेल्या इमारतीत बाहेर राज्यातून मुली व महिलांना आणून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर बोगस पंटर पाठवून खात्री केल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.