नवी दिल्ली – आजकाल स्मार्टफोन शिवाय काहीच चालत नाही. अगदी कमी किमतीतही चांगले, आपल्या गरजा पूर्ण करणारे स्मार्टफोन मिळतात. काही ब्रॅंडचे फोन चांगले असतात, परंतु ते महाग असतात. अशावेळी तुम्ही सेकंड हँडफोनचा पर्याय निवडू शकता. सेकंडहँड फोन घेण्यात वाईट काहीच नाही. कारण अनेकजण एक-दोन महिन्यात नवीन फोन विकून दुसरा फोन घेत असतात. पण असा फोन घेताना काळजी घ्यायला हवी.
सेकंड हँड फोन घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीकडून फोन घेणार आहात, त्याला प्रत्यक्ष भेटा आणि मग व्यवहार करा.
समोरासमोर भेटल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ज्यामुळे तुम्हाला समोरचा व्यक्ती फसवतो आहे की काय हे कळू शकेल.
जेव्हा तुम्ही हा फोन बघाल, तेंव्हा कमीत कमी १५ मिनिटे हा फोन वापरून बघा. यामुळे तुम्ही हा फोन व्यवस्थित हाताळू शकता की नाही, हे तुम्हाला कळेल.










