गेल्या ३ सप्टेंबर रोजी १७ हजार ५०० फूट उंचीवर उत्तर सिक्कीमच्या पठार भागात रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैन्याने मदतीचा हात दिला. यात दोन पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे. उणे तापमानात अडकलेल्या त्या तीन चिनी नागरिकांच्या जीवाला धोका होता. हे लक्षात येताच त्या उंच जागेवरून आणि कठीण हवामान परीस्थितीमध्ये त्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक तातडीने गेले. सोबत ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे घेऊन पोहोचले. भारतीय सैन्याने त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर ते परत गेले. तातडीने मदत केल्याबद्दल, चिनी नागरिकांनी भारत आणि भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या माणुसकी आणि कर्तव्याचे दर्शन घडले आहे.