नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी सॅमसंगने नव्या फिचर सह M-३१ मोबाईल लॉन्च केला होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता M३१ प्राईम ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अँमेझोनद्वारे २५०० रुपयांच्या सवलतीसह आता फोन खरेदी करता येणार आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला १५,४९९ रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमतेचा १६,४९९ रुपयांना आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा १८,४९९ रुपयांना विकला जातो.
ठराविक बँकेच्या क्रेडिट वा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास २५०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ऑफर अंतर्गत हे ६४ जीबी स्टोरेजचा १२,९९९ रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीचा १३,९९९ रुपयांमध्ये आणि ८ जीबी रॅमचा फोन १६,९९९ रुपयात मिळणार आहे. याशिवाय १२ हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तसेच ग्राहकांना एका वर्षासाठी सॅमसंग केअर प्लस अपघाती आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत ५४९ मिळू शकणार आहे.
इकोचा १ वर्षाचा नुकसान भरपायी म्हणून ४९९मध्ये सुविधा घेता येणार आहे. हा फोन ओशन ब्लू, स्पेस ब्लॅक आणि आईसबर्ग ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. यात ६००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर आधारती हा फोन आहे.