नवी दिल्ली – दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली कुन-ही यांचे रविवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. कंपनीने याबाबत परिपत्रक जाहीर केले असून याबाबत माहिती दिली आहे. त्यांचे कुटुंब, नातेवाईक यांच्याबद्दल तीव्र सहानुभूती आहे. त्याचा वारसा कायम राहील, सॅमसंग ग्रुपचे संस्थापक ली ब्युंग-चुल यांचा मुलगा लीचा जन्म दक्षिण कोरियाच्या दक्षिण ग्योंंगसांग प्रांतातील उरियांग काउंटी येथे ९ जानेवारी १९४२ रोजी झाला. २०१४ मध्ये ली यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि तेव्हापासून ते इस्पितळात दाखल होते. दक्षिण कोरिया जगातील १२ वे क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सॅमसंगच्या व्यवसायावर या अर्थव्यवस्थेचे वर्चस्व कायम आहे. कंपनीचा एकूण व्यवसाय हा दक्षिण कोरियाच्या जीडीपीच्या पाचवा भाग आहे.
१९७८ मध्ये जेव्हा ली यांनी त्यांच्या वडिलांकडून सॅमसंगचा कारभार स्विकारला त्यावेळी सॅमसंग ही केवळ टीव्हीच्या चिप आणि मायक्रोवेव्हचे पार्टस विकणारी कंपनी होती. मात्र ली यांनी कठोर मेहनत घेऊन संपूर्ण जगभरात दबदबा मिळविला आणि मोबाईल फोनच्या क्षेत्रात क्रांती घडविली.