मुंबई – इराणचे सर्वोच्च अणुवैज्ञानिक मोहसिन फकीरजादेह यांची हत्या करण्यासाठी सॅटेलाईट मशीनगन म्हणजेच उपग्रहाद्वारे संचालित स्मार्ट सिस्टम असलेल्या मशीनगनचा उपयोग केला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तस्नीम नावाच्या वृत्त संस्थेने ही बातमी एका वरिष्ठ कमांडन्टच्या हवाल्याने दिली आहे. इराणने अगोदरच या हत्येसाठी इस्राईलवर आरोप लावला आहे.
गुप्तचर संस्थांच्या मदतीने कृत्य
इराणच्या मते इस्राईलने पाश्चिमात्य देशांतील गुप्तचर यंत्रणांची मदत घेऊन हे कृत्य केले आहे. याचा उद्देश इराणच्या अणुकार्यक्रमाला धक्का पोचवणे हे आहे. चर्चा आहे की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहे. इस्राईलद्वारे सध्या इराणच्या या आरोपाचे खंडन केले गेलेले नाही. इस्राईलच्या एका अधिकाऱ्याच्या मते या हत्येचे अंतर्गत षडयंत्र लपविण्यासाठी इराणने तस्नीम न्यूजच्या माध्यमातून ही कहाणी रचली आहे.
हत्या करणारी नव्हती व्यक्ती
फकीरजादेह यांची हत्या २७ नोव्हेंबरला तेहरानच्या जवळील राज मार्गावर झाली होती. त्यावेळी अंगरक्षकांसोबत ते कारने जात होते. इराणचे रिव्होल्यूशनरी रिवोल्यूशनरी गार्ड्स फोर्सचे डेप्युटी कमांडर अली फादवी यांच्या मते फकीरजादेह कार चालवत असताना एका अत्याधुनिक कॅमेराने त्यांचा फोटो घेऊन त्यांच्यावर नेम धरण्यात आला असून त्यात कोणी आतंकवादी सहभागी नव्हता.
ट्रक मध्ये ठेवली होती मशीनगन
एका छोट्या ट्रक मध्ये ठेवण्यात मशीनगनला उपग्रहाद्वारे नियंत्रित केले गेले जात होते. उपग्रहाद्वारे संचालित अत्याधुनिक कॅमेराने अणूवैद्यानिकांचा फोटो घेऊन उपग्रहावर पाठविण्यात आला व स्मार्ट सिस्टम असलेल्या मशीनगने फायरिंग करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जमिनीवर नव्हते हत्यार
फकीरजादेह यांची हत्या बंदुकीने फायरिंग करून करण्याट आली असल्याचे प्रत्यक्षदर्शी सरकारी वृत्तवाहिनीला सांगताना म्हणाले. तत्पूर्वी त्याच ठिकाणी जोरदार आवाज होऊन विस्फोट झाल्याचेही सांगण्यात आले. जेव्हा की मागील आठवड्यात इराण सरकारने फकीरजादेह यांची हत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने करण्यात आली असून जमिनिवर कोणतेही हत्यार नसल्याचे सांगितले.