चेन्नई – प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीस श्वसनाचा त्रास होत असल्याने लगेचच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्याचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. अखेरीस त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेरीस वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास आहे.
९० च्या दशकात त्यांनी चित्रपटासाठी गायन सुरु केले. मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यानी गायन केले होते. ‘एक दुजे के लिये’ या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून काहीकाळ काम केले होते. तेलुगु, तमीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल ४० हजार गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. तसेच एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा रेकॉर्डही त्यांनी केला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च किताबाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.