मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची तब्बल १० तास चौकशी केली. सिशांतसिंह याने आत्महत्या का केली, त्यापूर्वी काय घडामोडी घडल्या होत्या, त्याच्याशी झालेला वाद, आर्थिक व्यवहार अशा विविध बाबींची चौकशी पथकाने केली. सीबीआयच्या चौकशीचा शुक्रवारी आठवा दिवस होता. अंमली पदार्थाचे सेवन सुशांत करीत असल्याचा मुद्दा पुढे आल्याने त्याबाबतही सीबीआयने तपास सुरू केला आहे. आतापर्यंत सुशांतचा स्वयंपाकी, शेजारी यांची पथकाने चौकशी केली आहे.