मुंबई – अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात राज्य सरकारची नक्की भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. मात्र, सीबीआयने हा तपास मुंबई पोलिसांकडे द्यावा, असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळविले आहे. यासंदर्भातील वृत्त अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी दिले आहे. मुंबई पोलिस योग्य रितीने तपास करीत आहेत, असेही सरकारने म्हटले आहे.