मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग – एनसीबीने शुक्रवारी (१८ सप्टेंबर) मुंबईतून चार जणांना अटक केली. या चौघांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर अंमलीपदार्थ तसंच ४ लाख ३६ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणी बारापेक्षा अधिक लोकांना अटक केली असून, यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा समावेश आहे.
			








