मुंबई – अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी येथे दाखल झालेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या पथकाने स्वयंपाकीसह काही जणांची चौकशी केली. पथकाने एकास ताब्यात घेतल्याचेही सांगितले जात आहे.
सुशांतसिंह याचा मृत्यू का झाला, त्याच्याशी संबंधित सर्व बाबी पडताळून पाहण्याचे काम हे पथक करीत आहे. राजपूत यांच्या निवासस्थानासह विविध जणांचे जबाब, चौकशी हे पथक करीत आहे. यापूर्वी हा तपास मुंबई पोलिस करीत होते. मुंबई पोलिसांकडून या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआय पथकाला सुपूर्द केली जात आहेत. राजपूत यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान या पथकासमोर आहे. पहिल्याच दिवशी पथकाने राजपूत याचा स्वयंपाकी आणि काही व्यक्तींची चौकशी केली.