मुंबई – अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)चे पथक मुंबईत दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला आहे. त्यानुसार हे पथक आले आहे.
सुशांतसिंह याचा मृत्यू का झाला, त्याच्याशी संबंधित सर्व बाबी पडताळून पाहण्याचे काम हे पथक करणार आहे. राजपूत यांच्या निवासस्थानासह विविध जणांचे जबाब, चौकशी हे पथक करणार आहे. यापूर्वी हा तपास मुंबई पोलिस करीत होते. मुंबई पोलिसांकडून या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआय पथकाला सुपूर्द केली जाणार आहेत. राजपूत यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान या पथकासमोर आहे.