पुणे- येथील कवी राजेंद्र वाघ यांनी आज बुधवारी कृष्णामाई नारायण सुर्वे यांना त्यांच्या नेरुळ येथील निवास्थानी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्यावर लिहिलेली ‘शब्दब्रह्म ‘कविता फ्रेम करून भेट दिली. चांदवडचे कवी व चित्रकार विष्णू थोरे यांनी या कवितेला अक्षरसाज दिलेली आहे. एकूणच नारायण सुर्वे यांचा थोडक्यात जीवनपट उलगडणारी ही कविता शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरणार आहे. याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले, सुदाम भोरे,कवी उद्धव कानडे, कल्पनाताई आणि भाऊजी गणेश घारे आदी उपस्थित होते.