सुरगाणा – सुरगाणा शहरासह तालुक्यात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील होळी चौकात पारंपारिक पद्धतीने बंडोपंत जोशी यांनी केलेल्या मंत्रोच्चारात जेष्ठ नागरिक चंद्रमौळी चौधरी यांचे हस्ते विधिवत पूजन करून होळी पेटविण्यात आली. याप्रसंगी कमलाकर भोये, सोमनाथ पवार, भास्कर भोये, विनायक गुंबाडे, सुरेश धुळे, नारायण पवार, शंकर पवार, अनिल पवार, सदाशिव पवार, उत्तम पवार, सोमनाथ लहरे, माणिक लहरे, प्रविण पवार, रामू पागे, भरत पवार आदींसह दवाखाना पाडा व शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महिलांनी होळीचे पूजन करून पंचपक्वानाचा नैवेद्य अर्पण केला.