सुरगाणा – सुरगाणा येथे शववाहिका उपलब्ध नसल्याने कोरोना बाधित मृतदेह नेण्यासाठी अडचणी निर्माण होत असून एक शववाहिका नगरपंचायतीने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली होऊ लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शववाहिका उपलब्ध नसल्याने अन्य कारणांमुळे मृत झालेल्या व्यक्तींना कोणतेही वाहन उपलब्ध करून नातेवाईक घेऊन जातात. मात्र कोरोना बाधित मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्यात शववाहिका उपलब्ध नसल्याने संबंधित व्यक्तींना तसेच प्रशासनाला देखील अडचणीचे ठरू लागले आहे.
तालुक्यातील सतखांब येथील एका ५५ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र शववाहिका नसल्याने मृत व्यक्तीच्या तीघा मुलांना पित्याला कारमधून थेट स्मशानभूमीत नेऊन नियमांचे पालन करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागले. प्रथमच अंत्ययात्रेवीना पार्थिव देह थेट स्मशानभूमीत नेण्याची वेळ आली. एरव्ही आदिवासी भागात एखादी दुखद घटना घडल्यास संपूर्ण गावकरीच मदतीला धावून धावून येतात. येथे मदतीकरीता ग्रामस्थ आले मात्र कोविड 19 नियमाचे पालन करुन. तसेच मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितित अंत्यसंस्कार करण्याच्या अटीवर पोलिसांनी लेखी हमी पत्रावर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. गावातील कोरोना दक्षता समितीच्या देखरेखी नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोरोनाचे नियम पाळण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.