सुरगाणा – मराठी भाषा म्हणजे परिपूर्ण ज्ञान भांडाराचा खजिना होय त्यामुळे बुद्धिला चालना हवी असेल तर मराठी शाळेतून शिकले पाहिजे असे प्रतिपादन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली बागुल यांनी केंद्रीय शाळा बाह्य विशेष शोध मोहिम समितीच्या बैठकी प्रसंगी केले.या बैठकीत विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे केंद्र प्रमुख कृष्णा निरभवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफीजा अन्सारी, नगरसेवक शेवंता वळवी, बालरक्षक शिक्षक रतन चौधरी आदि उपस्थित होते.
यावेळी श्रीमती बागुल म्हणाल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थलांतरित तसेच कोविड काळात शाळेत जाऊ न शकणा-या मुलांकरीता तीन ते अठरा वयोगटातील शाळा बाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे हि बाब गौरवास्पद असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातुन कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माझीच मुले नाशिक येथे इंग्रजी माध्यमात शिकत आहेत मात्र कोविड परिस्थितीत ते शाळेत जाऊ शकली नाहीत. सद्य परिस्थितीत ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना इंग्रजी येते मात्र मराठी भाषा आणि अवघड वाटणारा गणित विषयात कच्चे होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना आता चांगल्या पद्धतीने वाचता येत असून अवघड वाटणा-या गणित विषयाची भीती मनातून नाहीशी झाली आहे. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच आपल्या पाल्याला पाठवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मराठी भाषा हि एकमेव अशी आहे की, या भाषेतून शिक्षण घेतले तर निश्चितच बुद्धिला परिपूर्ण चालना मिळेल मराठी हि ज्ञानभाषा असून प्राचीन संस्कृतीची ओळख या भाषेतूनच होत असते. बालरक्षक शिक्षक रतन चौधरी यांनी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करुन शोध मोहिम राबविण्याचा उद्देश्य स्पष्ट केला. या बैठकीला केंद्र स्तरावरील चुली, भदर,देवलदरी, मोठातळपाडा, लहानतळपाडा, सातबाभळ, नवापूर, वरसवाडी,वडपाडा, करंजाळी,चापापाडा, वडमाळ,करंजुल(सु), वरसवाडी आदि शाळेतील
शिक्षक चंदर चौधरी, यशवंत देशमुख, रामदास गायकवाड, भगवान थोरात, झांबरु जोपळे,निलम साबळे, विश्वास वाघमारे,हिरामण धुम, रतन पाडवी, योगेश कुवर, बाबुलाल पवार, सुभान महाले, रामदास घेगड, सखाराम पवार,हरी देशमुख,सुरेश जाधव आदि उपस्थित होते.