सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुरक्षेसाठी होळकर पुलाला बसवले सेन्सर्स; असे करणार काम

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 10, 2020 | 12:50 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201110 WA0022

नाशिक – ब्रिटीशकालीन असलेल्या आणि १२० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरीया) पुलाच्या सुरक्षेचा विचार करता, नाशिक स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट ब्रीज सर्वायलन्स सिस्टीम हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. यामुळे संभाव्य धोके व अपघात रोखले जाणार आहेत.

नाशिकमधील तरुण अरविंद जाधव व त्यांचे सहकारी यांनी साकारलेल्या स्मार्ट ब्रीज सर्वायलन्स सिस्टीम पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचे मार्गदर्शनाखाली सदर पायलट प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

होळकर पुलाखाली संवेदक (सेन्सर्स) बसविण्यात आले आहेत त्यामुळे कंपनांचे मापन होऊन त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात तात्काळ समजणार आहे. त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येथे लावण्यात आलेले सायरनही वाजणार असून धोक्याची सूचना नागरिकांना तात्काळ समजणार असून पुढील दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे.  महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर जाधव याने या संकल्पनेवर काम सुरू केले आणि आता त्याचा पायलट प्रकल्पाची सुरूवात जानेवारी 2020 मध्ये होऊन आता प्रायोगिक तत्त्वावर सदर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
IMG 20201110 WA0021
असे काम करणार सेन्सर्स 
पुलावरील वाहतुकीनुसार निर्माण होणारी कंपनं (वेगवेगळया दिशांमधील निर्माण होणारे व्हायब्रेशन), पिलर्सची हालचाल, पुलावरील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वायलन्स कॅमेरे, लोकांना सजग करणेसाठी सायरन (पुलाच्या दोन्ही बाजुस एक किलोमीटर लांबपर्यंत एैकु जाईल), पुराची पातळी तथा तेथील तापमान, आर्द्रता, हवेची गती यांची नोंद घेतली जाते. वरील सर्व सेन्सर्स हे सोलार एनर्जीवर काम करणारे आहेत. या माहितीमुळे पुलाखालील पुरपातळी कळण्यास, पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडण्याअगोदर पूर्वसूचना मिळण्यास किंवा दुर्भाग्यवश पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडल्यास लोकांना तात्काळ सजग करणेकामी आपोआप सायरन सुरु होण्यास मदत होणार आहे. सदर पायलट प्रकल्पाचा व त्याव्दारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा पुढील दोन ते तीन महिने आढावा घेण्यात येणार आहे. तद्नंतर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनी व सार्वजनिक बांधकाम विभाग तथा राष्ट्रीय राजमार्ग विभाग (NHAI) यांच्या महत्वपुर्ण पुलांवर अंमलबजावणी करणेकामी यांच्या स्तरावर विचार करता येईल.

IMG 20201110 WA0024
कशी झाली सुरूवात

महाड पूल दुर्घटनेनंनतर पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्ट्रक्चरल ऑडिट या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. अशा दुर्घटना टाळता येणे किंवा त्याबाबत पुर्वसूचना मिळणे शक्य आहे का? या संदर्भात नाशिकमधील तरूण अरवींद जाधव आणि त्याच्या सहकार्यांनी सदर संवेदक बनविले. आणि खऱ्या अर्थाने जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आलेले काम पूर्ण झाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुढच्या पावसाळ्यात मिळणार मलेरियाचाही अंदाज; हवामान विभाग सज्ज

Next Post

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विनानिविदा मिळणार एवढ्या लाखांचे काम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
min bharne

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विनानिविदा मिळणार एवढ्या लाखांचे काम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011