नाशिक – दिवाळीत सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतीषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
ही घ्या खबरदारी
दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करतांना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करून घ्याव्यात. तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत. घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आपातकालीन संपर्क-
आपातकालीन परिस्थितीमध्ये नजिकच्या महावितरण कार्यालयात, महावितरणच्या२४x७ ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हे लक्षात ठेवा : कोविड १९ चा संसर्ग पाहता शासनाच्या आवाहनानुसार फटाक्यांचा वापर करू नये.
– वीजतारांजवळ वा खाली रोषणाई करणारे फटाके उडवू व फोडू नयेत.
– विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.
– विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.
– रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात