चेन्नई – सुपरस्टार रजनीकांत यांनी ३१ डिसेंबरपूर्वीच मोठी घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी तीन पानी तमिळ भाषेतील पत्र ट्विटरवर पोस्ट करुन त्यांची भूमिका जाहिर केली आहे. ३१ डिसेंबरला ते त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. तसे त्यांनी यापूर्वीच जाहिर केले होते. मात्र, आज प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, रजनीकांत हे राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत. रजनीकांत यांच्या राजकीय एण्ट्रीमुळे संपूर्ण तमिळनाडूमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच, सोशल मिडियात त्याचे पडसाद उमटताना दिसत होते. तमिळ फिल्म इंडस्ट्री आणि राजकारण यांचे घनिष्ट नाते असल्याने ते लवकरच राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून दिसतील अशी अटकळ होती.. मात्र, ती फोल ठरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पत्रात हे लिहिले
माझ्या चाहत्यांना दुखावण्याची माझी इच्छा नाही. माझ्या या निर्णयाने चाहते निराश होणार असल्याची मला कल्पना आहे. पण, मला आता हा निर्णय घेतानाही खुप वेदना होत आहेत. सध्याचे आजारपण हे देवाने मला दिलेले संकेत असून ती वॉर्निंग असल्याचे मी समजतो. केवळ सोशल मिडियात प्रचार करुन मी जनतेचे कल्याण आणि राजकीय उन्नती करु शकणार नाही, असेही रजनीकांत यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणावरुनच रजनीकांत यांनी राजकीय पक्ष न उघडण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
— Rajinikanth (@rajinikanth) December 29, 2020