पुणे – ऑक्सफर्डच्या एझेडडी १२२ लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्याने भारतातही सिरम इन्स्टिट्यूटने लसीची चाचणी थांबवली आहे. लस देण्यात आलेली ब्रिटनमधील व्यक्तीला आजारी पडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. याची दखल घेऊन भारतातही लसीची चाचणी थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत ब्रिटनमधील चाचणीचा सकारात्मक अहवाल समोर येत नाही तोवर भारतातही चाचणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील भारती हॉस्पिटलमध्ये ही चाचणी केली जात आहे. भारतात १६०० व्यक्तींवर ही चाचणी करण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र, आता या सर्व प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.