जळगाव – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते उद्या शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी २ वाजता प्रवेश करणार आहेत. त्याचा सोहळा मुंबईत होणार आहे. यासाठी खडसे आपल्या कुटुंबातील मोजक्या व्यक्तींसमवेत मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.