नाशिक – केंद्र सरकारने कांद्यावर केलेल्या निर्यातबंदीमुळे परदेशात जाणारा निर्यातीचा लाखो टन कांदा सीमेवर, बंदरांवर अडकुन पडला होता. आता या निर्यातीला केंद्र सरकारने परवाणगी दिली आहे. हा कांदा काही काळ तसाच राहिला असता तर तो सडून शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असते. याचे गांभीर्य अोळखून .डॉ.भारती पवार यांनी तातडीने संसदेत प्रश्न उपस्थित करत कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी म्हणून प्रयत्न केले. त्याचप्रमाणे जे ट्रक आणि कंटेनर निर्यातीसाठी सीमेवर आणि बंदरावर अड़कून पडले होते. त्यातील कांदा खराब होऊन नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उदयोगमंत्री पियुष गोयल यांची तातडीने भेट घेतली होती. यात सीमेवर, बंदरावर अडकलेल्या मालास निर्यातीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याला आता परवाणगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापा-यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
—
निर्यातीसाठी अडकून पडलेल्या कांद्याबाबत पाठपुरावा केला. अखेर सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– डॉ. भारती पवार, खासदार