नवी दिल्ली – नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परिक्षेत नाशिकचे प्रसिध्द डॅा. प्रफुल्ल सुराणा व डॅा. सुनीता सुराणा यांचे चिरंजीव प्रसन्नकुमार सुराणा यांनी देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याला ४०० पैकी ३५७ गुण मिळाले असून त्याची टक्केवारी ८७.२५ आहे. या परिक्षेसाठी देशभरातून ७८ हजार १४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २७ हजार ३२७ उत्तीर्ण झाले आहे. त्याची टक्केवारी ३५.०३ आहे. देशात तिसरा क्रमांक या परिक्षेत सुराणाला मिळणे ही भूषणावही अशी बाब असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रसन्न संपूर्ण भारतात सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये तिसरा आला ही आत्तापर्यंतची नाशिक मधील उत्कृष्ट अशी रँक असल्याचे बोलले जात आहे. त्याची मोठी बहीण सेजल सुराणा ही गेल्या आठवड्यात सीए परिक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर हा निकाल आला आहे. प्रसन्ना सुराणा याचेआई-वडील दोन्ही डॉक्टर आहेत. ते सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.