नाशिक – सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीएआय भवन येथे निवडणूक फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आली होती. यात निवडून आलेल्या सदस्यांमधून २०२१ – २०२२ करीता सीए राजेंद्र शेटे यांची अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सीए सोहिल शाह, सचिवपदी सीए राकेश परदेशी, खजिनदार पदी सीए संजीवन तांबुलवाडीकर, त्याच बरोबर सीए पियुष चांडक यांची विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी कार्यकारणीचे मावळते अध्यक्ष सीए रोहन आंधळे व माजी अध्यक्ष सीए हर्षल सुराणा उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकारणी सदस्यानी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे स्वागत केले. याच बरोबर मावळते अध्यक्ष सीए रोहन आंधळे यानी आपल्या पदाचा पदभार नवनिर्वाचित कार्यकारणीस सोपविला व नाशिक शाखेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.