शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘सीएसआर’ मधून मालेगावात २५ शाळांना इमारती

by India Darpan
ऑगस्ट 8, 2020 | 2:22 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200808 WA0008

मालेगाव – ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेमध्ये बदल घडवून भारताचा चांगला नागरिक घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चालू आर्थिक वर्षात सामाजिक उत्तरदायीत्व निधी (सीएसआर) माध्यमातून तालुक्यातील २५ नवीन शाळा बांधण्याचा संकल्प असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
सिन्झेंटा इंडिया लि. या कंपनीच्या सी.एस.आर. निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निळगव्हाण, हाताने, जळकु चे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. भुसे म्हणाले की, गावातील शाळांचे कंपाऊंड, सुसज्ज वर्ग खोल्यांसह विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. त्याची आज पूर्तता होत असून या मागणीसाठी आग्रही विद्यार्थ्यांच्या हस्तेच आज भुमीपूजन करतांना विशेष आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बांधकामासाठी वृक्षतोड नाही
या तीनही शाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतांना कुठलीही वृक्षतोड न करता शाळांच्या इमारतींचे काम होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करतांना भुसे म्हणाले, कंपनीना होणाऱ्या नफ्यातील काही भाग हा सामाजिक कार्यासाठी वापरणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक असून आज सिन्झेंटा कंपनीने तालुक्यातील तीनही शाळांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्यांचा मी आभार व्यक्त करतो. जि.प.शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकण्यासाठी येतात. यापुर्वी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या परंतु आता शिक्षकांबद्दल चांगले अनुभव येत असून हा क्रांतीकारक बदल आज दिसून येतो. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीसाठी शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक व विद्यार्थी हे एक चांगले माध्यम आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक विषयावर निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे जनजागृती घडविता येवू शकते यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांच्या अडचणी सोडवू
शिक्षकांच्या चांगल्या सेवेतून शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येत आहे. शिक्षकांनी चांगली सेवा बजविण्यासाठी शिक्षकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सोयीनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आग्रही असून भारताचा चांगला नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांकडे असून त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन मंत्री भुसे यांनी यावेळी केले.
एकच अर्ज ग्राह्य
यापुढे कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यात युरियाचे नियोजन परिपूर्ण करण्यात आले असून गेल्या चार वर्षातील सरासरी वापरापेक्षा अधिक युरियाची  मागणी दिसून येत आहे. यामध्ये अधिकच्या युरिया मागणीची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले.
भूमीरूजन समारंभास सरपंच सुनिल सकट, सुरेखा गवळी, उपसरपंच प्रिती पठाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य दादाजी शेजवळ, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, गट शिक्षणाधिकारी एस.के.वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी निंबा निकम, सिन्झेंटा कंपनीचे रविंद्र पाटील, संजय पवार, टिळेकर, डॉ.भगवान कापसे, शिक्षक, व ग्रामपंचायतीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगावमध्ये विशेष कोविड सेंटर सुरू करा; पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

नाशिक- नवे बाधित ६०३; बरे झाले ६२९

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

नाशिक- नवे बाधित ६०३; बरे झाले ६२९

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011