नाशिक – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशासन, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातील वाद चव्हाट्यावर आले. सोशल मीडियावर जाहिरपणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. त्याचा अतिरिक्त ताण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, चतुर्थ कर्मचाऱ्यांवर आला आहे. त्यातून आता वाद उफाळून आला आहे. विशेषतः हॉस्पिटलसाठी हे तीनही घटक महत्त्वाचे असताना त्यांच्यात अतिरिक्त ताण आणि कामावरून वाद थेट सोशल मीडियावर सुरू झाला आहे. यामागे कोरोना कक्षात नियुक्ती, कामाचा ताण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष ही कारणे आहेत. तर, नर्सेस संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.