मुंबई – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याच्या आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून या संदर्भातील माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास प्राधान्य देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनीही या आगी संदर्भातील माहिती दिली आहे. आगीत कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेला कुठलीही बाधा पोहचलेली नाही. आगीच्या घटनेत कुणतीही जिवीतहानी झालेली नाही किंवा कुणाला गंभीर दुखापतही झालेली नाही असे सांगून पुनावाला यांनी पुणे पोलिस आणि अग्निशमन विभागाचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1352219439345795073
https://twitter.com/adarpoonawalla/status/1352210515880255489