सिन्नर – महिंद्रा ट्रॅक्टर्सचे वितरक युआरके ट्रॅक्टर्सने दसर्याच्या एकाच दिवशी तालुक्यात १२९ ‘सरपंच प्लस’ ट्रॅक्टर्स विकून विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. त्या व्यतिरिक्त ४० शेतकर्यांनी त्याच दिवशी नोंदणीही केल्याची माहिती आता समोर आली आहे. तालुक्यातील भाजीपाल्याचे आगार म्हटले जाणार्या ठाणगाव, गुळवंच, दोडी, निमगावसह अनेक गावांमध्ये अनेक शेतकर्यांनी दसर्यालाच ट्रॅक्टर खरेदी करीत महिंद्राच पहिल्या पसंतीचा असल्याचे दाखवून दिले. सर्वच १२९ ग्राहकांना दसर्याच्या मुहुर्तावर एकाच दिवसात ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तर रोख रक्कम भरत ४० ग्राहकांनी याच मुहुर्तावर सरपंच प्लस ट्रॅक्टरची नोंदणी केली. या सर्व ग्राहकांना लवकरच ट्रॅक्टर्सचे वितरण करण्यात येईल असे युआरकेचे संचालक उदय गोळेसर यांनी स्पष्ट केले. यावेळी काशीनाथ शिंदे, आनंदा कांगणे, आबा करंजकर, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, अमित पानसरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
एकाच दिवशी विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री
कोरोनाचे संकट सुरु असले तरी यंदा तालुक्यात मुबलक पाऊस झाला असून कांदा, टोमॅटो, बटाट्यासह भाजीपाल्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्यांच्या हातात चांगला पैसा आला आहे. या पैशातून ट्रॅक्टर घेण्याकडे शेतकर्यांचा सर्वाधिक कल दिसून आला. महिंद्रा ट्रॅक्टर्सने यंदा ‘सरपंच प्लस’ या नविन सिरीजचे नुकतेच अनावरण केले असून महाराष्ट्रभरातील शेतकर्यांच्या पंसतीला हा ट्रॅक्टर उतरला असल्याचे एकाच दिवशी विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री झाली.
उदय गोळेसर, संचालक, युआरके ट्रेडर्स