सिन्नर – येथील मुसळगाव एमआयडीसीमध्ये यशोधन अॅग्रो केमिकल्स या कंपनीवर छापा टाकून कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रक विभागाने कारवाई केली आहे. विनापरवाना अवैधरित्या बनावट किटकनाशकाचा साठा उत्पादन करुन विक्रीसाठी ठेवणे, किटकनाशकाची नोंदणी न करणे, उगम प्रमाणपत्र नसणे याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन व विक्री परवाना नसतांना शेतक-यांची दिशाभूल केली जात असल्यामुळे या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये विभागीय कृषी संचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रक ए.आर. घुमरे यांनी तक्रार केली आहे. या कारवाईत १ लाख ५९ हजार ३४० रुपयाच्या किटकनाशकाच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.