नाशिक – जिल्हयातील सिन्नर तालुका वगळता उर्वरीत नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण व देवळा या तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदासाठी १२ व १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी काढले होते. पण, आज नवीन आदेश काढत सिन्नर पाठोपाठ निफाड व चांदवडच्या निवडणुकाही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या तीन्ही तालुक्यासाठी स्वतंत्र आदेश पारीत करणार आहे. हे तीन तालुके वगळता नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, येवला, मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण व देवळा येथे निवडणुका मात्र होणार आहे.
जिल्हयात १३ तालुक्यातील ६१९ ग्रामपंचयातीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे. सदर ग्रामंपचातींची सरपंच व उपसरपंच निवडणूक घेण्यासाठी हे आदेश पारित करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे दहीवडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत उच्च न्यायालय येथे रिट पिटीशन दाखल झाले आहे. त्याबाबत ५ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने आदेश पारीत करुन १६ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक न घेण्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे सिन्नर तालुका वगळता ही निवडणूक होणार आहे असे सोमवारी आदेशात जिल्हाधिकारी यांनी म्हटले होते. पण, आज नवीन आदेश काढत त्यात चांदवड तालुक्यातील वागदर्डी, निफाड तालुक्यातील करंजगाव व सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी व रामपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत रिट याचिका दाखल आहे. त्यावर उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी पर्यंत निवडणुका न घेण्याचे आदेश केले आहे. त्यामुळे सिन्नर, निफाड व चांदवडच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे.
जिल्हाधिकारी यांनी ९ फेब्रुवारी रोजी काढलेला आदेश
……