नाशिक – सिन्नर येथे १५०० रुपये लाच स्विकारतांना शिवडे येथील तलाठी हरिष लासमन्ना ऐटवार हे लाच लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठीने तक्रारदार यांचे आई आणि मामाची वारस नोंद लावण्यासाठी दोन हजाराच्या लाचेची मागणी केली होती. पण, तडजोडीअंती पंधराशे रुपयाची लाचेची रक्कम लक्की टी स्टॉल संगमनेर नाका सिन्नर येथे स्विकारली. त्याचवेळेस ही कारवाई करण्यात आली.
अँन्टी करप्शन ब्युरोने दिलेली माहिती
*== सापळा कारवाई ==*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-३o
▶️ *आरोपी-* हरिष लासमन्ना ऐटवार वय 31 तलाठी वर्ग -3 शिवडे सजा ता सिन्नर जि. नाशिक
▶️ *लाचेची मागणी-* 2000/-₹
▶️ *लाच स्विकारली-* 1500/₹
▶️ *हस्तगत रक्कम-* 1500/-रु,
▶️ *लाचेची मागणी -* ता.22/02/2021
▶️ *लाच स्विकारली -* ता. 22/02/2021
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांचे आई आणि मामाची वारस नोंद लावण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे दि. 22/02/2021 रोजी/- रु.2000/- रू. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1500रुपये लाचेची रक्कम लक्की टी स्टॉल संगमनेर नाका सिन्नर येथे स्विकारली. म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी-* सुनील पाटील, पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक
▶️ *सापळा पथक* – पोना हेंबाडे, पोना गिते चालक पोशिं जाधव लाप्रवि नाशिक
▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.श्री विजय जाधव,पोलीस उपअधीक्षक, वाचक,नाशिक लाप्रवि
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. जिल्हाधिकारी, नाशिक
————————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================